आजी कविता {मराठी कोट्स}| Aaji Quotes In Marathi | Aaji Aajoba Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आजी शायरी मराठी {Aaji quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आजीचे खूप महत्व असते.आजी म्हणजे प्रेम काळजी आणि गोड खाऊ यात गेलेले आपले बालपण असते.आपल्या लाडक्या आजीला आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण माझी आजी कविता {Aaji status in marathi} विचार पाठवू शकता. आजी स्टेटस मराठी {Missing grandmother quotes in marathi} वाचून तुमच्या आजीला आनंद होईल.तुम्ही जर माझी आजी निबंध {Majhi aaji nibandh in marathi} लिहीत असाल तर हा लेख तुम्हाला खूप मदत करेल.आजीला आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आजी आजोबा कविता {Quotes on grandmother in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

आपल्या आजीआजोबांना संदेश {Aaji aajoba quotes in marathi} देण्यासाठी तुम्ही आजी स्टेटस {Miss u aaji status in marathi} किंवा आजी वर कविता मराठी {Aaji kavita in marathi} आपण पाठवू शकतो. जर आपण आजीला मिस करत असाल तर आजी कविता मराठी {Short quotes on grandmother in marathi} हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे आजी विषयी कविता {Miss you aaji marathi status} जरूर आवडले असतील.

꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏
आजी कविता

आजीची माया असतेच अशी
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी 💕

आजीची माया असतेच अशी
तूप रोटी साखर खावी जशी 🙏

आजीची माया असतेच अशी
मुरंब्याची गोडी वाढावी जशी 🌠
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

छान छान गोष्टी म्हणजे आजी
लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी 💕
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी
रानातली मस्त सैर म्हणजे आजी 🙏
जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी
गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी 💞
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते 💕
जर आई रागावली की आपली आजी वाचवते
माझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा
आजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा 💕

आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान
भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान

नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी 🙏
आई-वडिलांचा मार चुकवणारी

मला कुशीत घेऊन झोपवणारी 💞
मला कडेवर घेऊन फिरणारी

हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी
जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी 🌠

माझी लाडकी आजी
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

प्रिय आजी 💕
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏
अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे
हेच त्याच्याकडे मागणे ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Aaji Quotes In Marathi

चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल 💕
वाढले असले वय जरी
तरी आजी माझी आहे कमाल 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

अनुभवांनी भरलेले आयुष्य
चालून थकते काही पावले 💕
जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

तू मला अंगाखांद्यावर खेळवले
तूच मला जीवन जगणे शिकविले 💕
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

घरातल्या सर्व खोल्या सोडून
आजी जिथे असेल तिथेच वावरायला मला आवडते 💕
आजी जिथे असेल तेच घर वाटते
आजीने बनवलेले जेवणच सगळ्यात भारी लागते 🙏

गावी गेल्यावर अजूनही
तिच्याच कुशीत झोपायला आवडते
आजी जिथे असेल तेच घर वाटते 💞
किचनमध्ये तिच्या आसपास लुडबुड करायला मला आवडते

नवीन पदार्थ बनवत असताना ✨
आजीला कृती वाचून दाखवायला ओट्यावर बसावे लागते
आजी जिथे असेल तेच घर वाटते 🌠
आजी बाहेर गेल्यावर घर मोकळे मोकळे वाटते

मन आजीला शोधत भटकत राहते
तेव्हा कळते कि आजी आहे म्हणूनच घर घर वाटते ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर पान
खुप आठवणी गोष्टी संस्काराचा साठा 💕
आजी ही व्यक्ती तशी नातवंडांना आवडणारी
मग ते लाड करण्यासाठी असो किंवा 🙏
आई बाबाचा मार चुकवण्यासाठी
बरंच काही शिकवण्यासाठी 💞
जुन्या काही परंपरा आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी
आजीसारखं माध्यम नाही 🌠
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी 💕
दाटलेल्या नयनांमध्ये उभी राहते
मूर्ती आजी तुझ्या हसऱ्या मुखाची
अजूनही आठवण येते झोपताना 🙏
मला आजी तुझ्या ऊबदार कुशीची
आजी तू पुन्हा प्रेमाने मला तुझ्या कुशीत घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?

आजही आठवते मला गोडी 💞
आजी तू केलेल्या पदार्थांची
माझ्या हट्टापायी केलेल्या
आजी तुझ्या हातच्या मासवड्यांची 🌠
आजी तू पुन्हा मला मायेचा घास भरवशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ?

आलो गावी घरी कधी तर ✨
आजी होते जाणीव मला तुझ्या अस्तित्वाची
अलगद भासवून जाते मनी
मला पाहून झालेल्या तुझ्या आनंदाची 🔥
आजी तू पुन्हा मला कुरवाळून मुका माझा घेशील ना ?
सांग ना आजी तू परत येशील ना ? 💫
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Aaji Aajoba Quotes In Marathi

आजी सोडून गेली
मन माझे उदास उध्वस्त झाले 💕
काही सांगायचे आज न उरले
सगळ्या गोष्टीत आजी तुझी आठवण येते 🙏
कधी तिला परत भेटेल असे मला झाले

काही सांगायचे आज न उरले
मन उदास माझे झाले 💞
मन उध्वस्त माझे झाले
सगळे सोडून अचानक गेलीस तू आजी
काही सांगायचे आज न उरले 🌠
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजी
तू जाऊन वर्षे झाली तरीही आजी 💕
तू सांगितलेल्या गोष्टींचा ओलावा अजून जाणवतो आहे
जुनाट साड्यांतून साकारलेल्या गोधडीतून 🙏
आजी तुझी ऊब आजही मी अनुभवतो आहे

तुझे थरथरते ओठ 💫
आजी आता माझ्या गालावर प्रेम ओसंडत नाहीत
कोणतेही पुस्तक आणल्यानंतर 💞
आजी तुझ्या आठवणी आल्याखेरीज राहत नाहीत

घर सुद्धा आता सुनंसुनं वाटते
अजूनही वाटते आजी तुझे बोट कितीही दुखले
तरी फोडत बसायचीस शेंगा दिवसभर 🌠

आता जाणवतोय आमच्याच अहंकाराचा हिंदोळा
खरेच आठवतोय तुझा मायेचा झोपाळा 💫
चाललोय तर आहोत घेऊन भार भविष्याचा
निर्धार हवा आहे आजी तुझ्या प्रेमाच्या संचिताचा ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

सावलीत मी तुझ्या
हक्काने वाढत गेलो आजी 💕
काळजीने तुझ्या
हळवा होऊन गेलो आजी 🙏

नातू म्हणून मी तुझा
मी धन्य धन्य झालो आजी
आजी तुझी ती अनमोल साथ 💞
सदैव राही माझ्या मनात

आजी तू लक्ष्मी वरदा माझी
माझ्या सर्व गोष्टींना तू राजी 🌠
आजी तु आमच्या प्रेमाचे समर्पण
हे आजी अगदी झाले अर्पण
एकटी करुनी गेली तू आम्हा न बघता हे दर्पण ✨
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

घरात असते एक प्रेमळ म्हातारी
म्हणतात तिला सगळे आजी 💕

जोपर्यंत असते आपल्या सोबत
नाही कळत आजीची किंमत 🙏

चेहरा आजीचा आहे सुकलेला
पण तिच्या हृदयात मात्र प्रेमाचे पाणी 🌠

नसते काही इच्छा आजीची
फक्त द्यावा तिला थोडावेळ कुणी 💞
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Corona मुळे गावी मी गेलो
आजीने माझ्या डोक्यावरून हात फिरवत 💕
कडकड आपली बोटे मोडलीत
आणि पटकन माझा एक मुका घेतला 🙏
आणि तिथेच कोरोना हरला आणि
माझ्या आजीचे प्रेम जिंकले 💞
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Majhi aaji nibandh in marathi

मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले 💕

आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची 🙏

आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी 💞
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ असलेल्या घरात
आता नाही वाट बघणारी माझी आजी 💕
मिठीत घेऊन डोक्यावरून हात फिरवायला
आता नाही माझी आजी 🙏

लिहायला जमलेच नाही तू असताना
लिहिल्या कविता आजी तुझ्यासाठी
कारण शब्द सुद्धा कमी पडायचे 💞
आजी तुझे प्रेम व्यक्त करताना

आजी तु नसल्याने पोकळ वाटतेय माझे आयुष्य 🌠
काही कळेनासे झाले आहे की कसे राहील माझे भविष्य
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

खूप भाग्यवान लोकांना मिळते आईची साथ
परंतु मी इतका भाग्यवान नाही 💕
कारण मी आईपासून कधीच दुरावलो आहे
पण माझे भाग्य आहे की 🙏
मला आईची माया देणारी आजी मिळाली
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Miss you aaji marathi status

दोन रंगाच्या आजीने शिवलेल्या
गोधडीतील ऊब सांगते 💕
आयुष्यभर सोबत फक्त आठवणींचीच
कारण आजी थोडी आयुष्यभर पुरते 🙏
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

माझी "अशिक्षित" आजी म्हणायची
मेंदूला कुलूप लावून चावी गटारीत फेकलेल्या 💕
"अडाणी लोकांच्या" नादी लागून
त्यांना कधी समजवत नाही बसायचे 🙏
कारण त्यात आपलाच वेळ जातो
पण आता समाजातील so called "प्रतिष्ठित हुशार"
लोकांनीच जुन्या बुरसटलेल्या
किंवा एक विशिष्ट विचार मेंदूत ठेऊन 💞
मेंदूची चावी फेकून दिलेली दिसते
तर त्या "प्रतिष्ठित हुशार" असलेल्या लोकांचे काय करायचे 🌠
हे काय आजीने सांगितलेच नाही बुवा ?
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

त्याला पाहिले अन् माझी नजर खिळली होती
तुला देखणा नवरा मिळेल असं आजी म्हणली होती 💕

रमताना संसारात घरी जाणे विसरून जाते हल्ली
माहेरी परतायची नाहीस तू असं आजी म्हणली होती 🙏

घरातली काडी पण मर्जीविना माझ्या हलत नाही
सासरी राज्य करशील असं आजी म्हणली होती

दोघांच जगने अन् आनंदाचा संसार करशील 💞
नांदा सौख्यभरे असं आजी म्हणली होती

माझ्याच आयुष्याला दृष्ट लागेल माझी 🌠
नक्की कोणत्या मुहूर्तावर सुखी राहा आजी म्हणली होती
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आजीच्या थरथरणाऱ्या हातांची
मऊशार माया 💕
मला वाटते हवीहवीशी
मनात साठवाया 🙏

आजीच्या मांडीवर डोके ठेऊन
आकाशतल्या चांदन्या मोजव्यात
आजीने सांगितलेल्या कथेत 💞
स्वतःचा एक नवीन शोध लागावा

तिचा पदर धरून
मग मागे-मागे फिरावे 🌠
बाबांकडून हट्ट पुरवण्यासाठी
आजीला लाडीगुडी लावावे ✨

आजी तुझ्या हातांची चव
या संपूर्ण जगात कुठेच नाही 💞
आणि तू घास भरवल्याशिवाय
आजी माझी भूक संपत नाही 🌠

तुझ्या निस्वार्थ प्रेमाची छाया
आजी नको सोडूस मला कधी 💕
कारण तुझ्याशिवाय घराच्या घरपणाला
पूर्णत्व येणार नाही 🌟
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

Miss u aaji status in marathi

आजी माझी जशी चंद्रकोर
जगण्याचा तिचा अनुभव थोर 💕

कपाळावर तीच्या आठी
शिकवितात जीवनातील 🙏
आडकाठींच्या गाठीभेठी

तशी धडधाकट आहे माझी आजी 🌠
बनवते ती चविष्ट भाकरी आणि भाजी

आजीच आमचा पाया 💞
आणि आजीची आम्हा सगळ्यांवर अफाट माया
꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏

आम्हाला आशा आहे कि Miss You Aaji Status In Marathi | माझी आजी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आजोबा Aaji marathi kavita {भावपूर्ण श्रद्धांजली आजी},Poem on aaji in marathi {माझे आजी आजोबा मराठी निबंध},Majhi aaji essay in marathi ,Ajoba quotes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता आजी {Miss u quotes in marathi} ,आजीसाठी स्टेटस {Mazi aaji essay in marathi},आजी कविता संग्रह {Happy birthday aaji in marathi},Aaji birthday wishes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi
मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi
वडील चारोळ्या मराठी {60+ कविता} | Poem On Father In Marathi | Baba Quotes In Marathi
आजोबा कोट्स मराठी {कविता} | Grandfather Quotes In Marathi | 20+ Ajoba Quotes In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post