आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | Aai Kavita In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आई शायरी मराठी {Aai Marathi Quotes} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आईचे अनन्य साधारण महत्व असते.आपली आई म्हणजे प्रेम काळजी विश्वास आपुलकी यांचे भांडार असते.आपल्या लाडक्या आईला आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण आई वर कविता {Aai Status In Marathi} विचार पाठवू शकता. आई स्टेटस मराठी {aai quotes in marathi} वाचून तुमच्या आईला आनंद होईल.मुलांकडून कोणतीही अपेक्षा न करता आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करते.आईवरचे आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आई साठी दोन शब्द {Quotes on mother in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

Table of content ➤
आई विषयी सुंदर कविता
आई वर चारोळी

आपल्या आईला मदर डे शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आई स्टेटस {Mothers Day Quotes in Marathi} किंवा आई वर कविता मराठी {Mom quotes in marathi} आपण पाठवू शकतो. जर आपण आईला मिस करत असाल तर आई कविता मराठी {Short quotes on mother in marathi} हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे आई विषयी कविता {Aai caption in marathi}जरूर आवडले असतील.

आई विषयी सुंदर कविता

आपल्या आईला सुंदर कविता पाठवण्यासाठी Aai var marathi kavita पाहू शकता आणि आपल्या आईला खुश करू शकता

आई विषयी सुंदर कविता
करावे किती आई तुझे कौतुक
अपुरे पडती शब्द हे माझे ❣
नाही फेडू शकत
उपकार आई तुझे ।। 🙏
अमृतासमान मला तू
पाजला ग पान्हा
जसे मांडीवर यशोदा आईच्या ❣
श्री कृष्ण बाळ तान्हा ।।
सर्व अवगुणांचा माझ्या
केलास आई तू विलय
होतात माझे सर्व गुन्हे माफ 🙏
असे आई तुझे न्यायालय ।।
आई तुझ्या कुशीतली गाढ झोप ❣
संपूर्ण संसारात नाही
पुढचे सातही जन्म तुझ्या गर्भात मिळो
मी एवढीच वाट पाही ।। 👪
असे वाटते मजला
जगावे पुन्हा येऊनी तुझ्या मी पोटी ❣
तुझ्याविना सर्वच दुनिया
मला वाटे खोटी ।।
आई तूच माझ्या आयुष्याची 🙏
बदललीस ग काया
साष्टांग नमन करुनी ❣
पडतो आई मी तुझ्या पाया ।।
प्रेम तुझे आहे आई
या सर्वांहून भारी
म्हणूनच म्हणतात ❣
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ।।🙏
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आकांत श्वासांत शांतता कुजबुज जीवन माझे
आई विन शुन्य आसपास मावळे काळोख जीवन माझे 🙏
आई असता जवळ भासे आकाश जवळ माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
आई आहे असेल असणार कुणी शब्द तोडिले माझे
आई का अपराध असा ईश्वराचा का तेज लपवती माझे 🙏
आई अश्रुंची अभेद्य चौकट चित्रपुराण माझे
आई कोणीच नाही माझे
आई तुजविण करूणेचे हात पोरके ❣
वर्षे अनेक झाली
गेली माझी माय 🙏
परंतु तिची सवय
जाणार नाही ❣

कुटुंबासाठी तिने
काया आपली झिजवली 🙏
तक्रार न केली तिने
कधी काही ❣

आम्हास घडविले
अर्थ संस्कार सांगून 🙏
अवघे तिचे जीवन
हेची आमचे गुरु ❣

कसे वागायचे
हे ना करायचे 🙏
नव्हते शब्दांचे
काहीहि काम ❣

आले वाट्या तिच्या
कठीण ते जीवन 👪
आनंदाने जगून
तिने दाखविले ❣

चटके हे दुःखाचे
हसत तिने सोसले 🙏
जीवन सुस्थितित
गर्व करण्यासारखे ❣

अल्प मृत्यू रोगी
लढली ती खंबीर 👪
मानली ना हार
काहीही नाही ❣

दु:ख भोगिले
वेदना होत्या अनेक 🙏
अश्रू परी एक
न तिने दाखविला ❣

तिची अशी दुर्दम्य
अवस्था पाहुनी 👪
मरणही लपुनी
हळूच आले ❣

आहेत साथ अजून
तिच्या आठवणी 🙏
जसे ती होवुनी
माझ्यासोबत वावरती ❣

मला ती सांभाळती
मला हळूच निजवती 🙏
मला दावती चुकता
माझा मार्ग कधी ❣

हवी ती शिक्षा
देवा मला देई 👪
पण कधी आई
माझी नेवू नको ❣
आई वर चारोळी
माय असते मंदिराचा उंच कळस
माय असते अंगणातली पवित्र तुळस ❣
माय असते भजनात पवित्र अशी संतवाणी
माय असते वाळवंटात प्यावे थंडगार पाणी 🙏
हृदयाची हाक असते आई
निःशब्द जाग असते आई
अंतरीचे गूढ असते आई ❣
परमात्म्याचे नाव असते आई
केवळ काया नसे आई
ओंजळभर माया असे आई 🙏
गगनभरारी असते आई
पंढरीची वारी असते आई
दुधाळ सावली असते आई 👪
आभाळ माऊली असते आई
अक्षयगान असते आई
कर्णाचे दान असते आई ❣
देवी धरतीवरची माय माझी
साठा सुखाचा माय माझी
मैत्रीण गोड माय माझी ❣
मायेची ओढ माय माझी
प्रेमाची बाहूली माय माझी
दयेची सावली माय माझी 🙏
स्वतः उपाशी राहून
मला भरवणारी माय माझी 👪
जीवाचं रान करून
माझ्यासाठी राबणारी माय माझी 🙏
जगण्याचा अर्थ शिकवणारी माय माझी
कधी ओरडून समजावणारी माय माझी 👪
बोट धरून चालायला शिकवणारी माय माझी
माझे अस्तित्व घडवणारी माय माझी ❣
आयुष्य हे शेत माय असे विहीर
आयुष्य ही नौका तर माय असे तीर 🙏
आयुष्य ही शाळा तर माय असे पाटी
आयुष्य हे कामच काम तर माय असे सुट्टी ❣
आई तुझे लेकरू आज खूप एकटे पडले
एका स्पर्शासाठी तुझ्या ते आज खूप रडले 🙏
आई तुझ्या मायेच्या सागराने मला
कधी वादळ तर कधी किनारे दाखवले ❣
आई तुझ्या छायेत माझे घर असू दे
असे नेहमीच वाटायचे
जवळ तू नसताना मनात काहूर माजायचे 👪
आज सोडून तुला मी जगायला शिकतोय
तू सांगितलेल्या कथाचा मी अर्थ आज जाणतोय
नसते कोणीच आपले हे मी खरेच पाहतोय 👪
आई मला घे जवळ मला साथ तुझ्या राहू दे
आई तुझ्या डोळ्यांनी हे विश्व मला पाहू दे
धन्य झालो मी आई तू मला भेटलीस 🙏
असे वाटते मला देवाशीच मैत्री मी गाठली
तू आहेस माझी आई ❣
आई एक नाव असते
जगावेगळा भाव असते 👪
आई एक जीवन असते
प्रेमळ मायेचे लक्षण असते ❣
आई एक श्वास असते
जिव्हाळ्याची रास असते 🙏
आई एक आठवण असते
प्रेमाची साठवण असते
आई एक वाट असते
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ असते 👪
आई एक गोड नाते असते
बहरणाऱ्या जीवनाची हिरवी पात असते
आई अनंत ठेव असते 🙏
जीवापाड जपणारी एकमेव असते
आई एक सूंदर घर असते
वात्सल्याची सर असते
आई नेहमी घेताना नाव तुझे 👪
नेहमी मला हुंदका येतो
तू दिलेल्या आयुष्याचे ऋण
फेडू शकेन का मी आई ❣
Aai Kavita In Marathi
वात्सल्याची होते बरसात
आई तुझा हात 🙏
उन्हात आभाळाची छाया
आई तुझी माया 👪
साठलेला गोड मध
आई तुझे शब्द ❣
पोथी ग्रंथाची खाण
आई तुझे ज्ञान
जिथे विश्व सारे येते 🙏
आई तुझे गाणे
मिळे प्रेम आणि शांती
आई तुझी मूर्ती ❣
जगी आई समान कोण आहे
जिचे जन्मोजन्मीचे ऋण आहे 🙏
असे ऋण हे की ज्याला व्याज नाही
ऋणाविन माझ्या आयुष्याला साज नाही
जिने सोसल्या यातना कोटी कोटी ❣
जन्म लाभला मला तिच्या पुण्य पोटी
जिच्या यातनाचे या जगी मोल नाही
तिच्यासारखा अमूल्य बोल नाही
जिने लाविला या लेकरांना लळा 🙏
तिच्या दैवी लेखी का उन्हाळी झळा
जिच्या पूजनाला पूर्ण जगी फूल नाही
अशा देवतेचे जगी नाव असे आई ❣

आई वर चारोळी

आपल्या प्रेमळ आई विषयी कविता पाठवण्यासाठी आई शायरी मराठी {Aai sms marathi } पाहू शकता आणि आपल्या आईला आपल्या भावना सांगू शकता.

आई शायरी मराठी
माय असे उन्हातील सावली
माय असे पावसातील छत्री 🙏
माय असे थंडीतील शाल
यावीत आता दु:खे खुशाल ❣
काय लिहू मी आईसाठी
कसे लिहू मी आईसाठी 🙏
पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे
आईसाठी लिहीण्याइतपत
माझे व्यक्तिमत्व नाही मोठे ❣
खिशातल्या हजार मूल्य सुद्धा 👪
बालपणी आईने खाऊ खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते ❣
aai quotes in marathi
आई नेहमी वेगळीच असते 👪
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते ती मैत्रीण असते 🙏
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते
खरच आई किती वेगळी असते ❣
या आयुष्याच्या वाटेवर 👪
अनेकांचे चेहरे
बदलतांना मी पाहिले 🙏
आईला प्रत्येकवेळी मात्र
प्रेम करताना पाहिले ❣
दुखाचा डोंगर असो कोसळलेला
किंवा वर्षाव होत असो सुखाचा 🙏
चिंतेचे ग्रहण लागलेले असो मनाला
किंवा तारे लुकलुकत असो आठवणीचे
आठवते फक्त माझी आई ❣
अवघड मार्गही सहज पार होतात
जेव्हा आशीर्वाद आईचे आपल्या सोबत असतात ❣
सहन करताना वेदना
मुखातून एक शब्द सदा येई 🙏
प्रेमाचा पाझर पसरवून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई ❣
जी डोळ्यात बघून माझ्या मनातील ओळखते
ती फक्त आणि फक्त माझी आईच असते ❣
aai quotes in marathi
आपल्या लेकराला हसवण्यासाठी 👪
जी स्वतः रडायला तयार असते
ती फक्त आणि फक्त मायच असते ❣

आम्हाला आशा आहे कि Mothers Day Quotes In Marathi | आई शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आई Quotes in marathi {Aai kavita} ,आई म्हणजे काय {Aai quotes}, आई Quotes {Poem on mother in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता आई {Aai status in marathi for whatsapp} ,आई साठी स्टेटस {Aai shayari marathi},आई कविता संग्रह {Aai status marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
Aai Quotes In Marathi | 100+ आई शायरी मराठी
100+ आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Aai
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi
१००००+ Text Faces (✿ ꈍ‿ꈍ)˘ε˘˶ ⋐)

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post