आजोबा आणि नात कविता | Grandfather And Granddaughter Poem

आजोबा आणि नात कविता

आजोळ म्हटले की मला आठवते
आजोबांबरोबर पाहिलेले प्रत्येक दृश्य
आजीचे तिच्या ताटातले घास भरवने आणि
त्यांच्यासोबत घडलेले माझे संपूर्ण आयुष्य
❈❈❈❈❈❈❈❈❈

माझ्या इवल्याश्या बोटाना दिला आपण आधार
सोडून गेला तुम्ही मला झालो मी निराधार
बालपणापासून आजोबांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो
मे महिन्यात गावी आल्यावर आजोबांच्या कुशीत मी दडलो
आयुष्य कस जगावे हे तुम्ही मला शिकवले
कशी असावी माणुसकी हे तुमच्याकडूनच कळाले
आजोबा तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून मला चालायचे आहे
आजोबा तुम्ही दिलेल्या शिकवणीतुन मला शिकायचे आहे
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोबा तुमच्या सुरकुतेल्या हाताला
पकडून वाटते निघून जावे दूर
जिथे असणार फक्त तुम्ही
आणि मी आपल्या प्रेमळ आठवणींची चाहूल
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
वयाचे तुम्हाला नाही बंधन
शिखर सर करता तुम्ही पटपट
शरीर आपले आहे पिळदार
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोळ म्हटले की मला आठवते
आजोबांबरोबर पाहिलेले प्रत्येक दृश्य
आजीचे तिच्या ताटातले घास भरवने आणि
त्यांच्यासोबत घडलेले माझे संपूर्ण आयुष्य
❈❈❈❈❈❈❈❈❈

सफेद सदरा त्याचा सफेद आहेत केस
असा आहे माझ्या आजोबांचा वेष
थोडी मिर्ची आहेत थोडे गोड
कधी कधी करतात माझी थोडी खोड
एकदम चविष्ट जेवणाचे ताट
"लगेच या आजोबा मी मारतोय हाक!"
अजून मजबूत आहे त्यांचे हाड
आम्हा नातवंडांचे करतात खूप लाड
असे आहेत माझे लाडके आजोबा
❈❈❈❈❈❈❈❈❈

धन्यवाद आजोबा
तुम्ही माझे बालपण सुंदर बनवले
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोबा असतात
ताटात वाढलेल्या लोणच्यासारखे
थोडीच असते पण
सगळ्या जेवणाची गोडी नक्की वाढवते
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोबा तुम्ही नसता तेव्हा अस्वस्थ होतं माझं मन
तुमच्या काठीचा आवाज येता मनावरचे जाते दडपण
आजोबा तुम्ही नसता तेव्हा आयुष्य वाटते अपुरे
तुमच्या येण्याने जीवनात येतात आनंदाचे झरे
❈❈❈❈❈❈❈❈❈

तुमचे कार्य बघून उर येतो आमचा भरून
म्हणूनच म्हणतो आम्ही सारे
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
❈❈❈❈❈❈❈❈❈

आजोबा अर्थ
आ - आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ करणारे
जो - जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारे
बा - बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते
जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जाते
❈❈❈❈❈❈❈❈❈

Post a Comment

Previous Post Next Post