वेळ मराठी स्टेटस | Time Quotes In Marathi | वाईट वेळ स्टेटस

वेळ स्टेटस मराठी {Quotes on time in marathi} जर आपण शोधात असाल तर आपल्याला या लेखात 60+ वेळ स्टेटस {Time shayari marathi} मिळतील जे आपल्याला नक्कीच आवडतील.योग्य वेळ आणि योग्य माणूस आपल्या आयुष्यात असले कि आपले आयुष्य सुखी होऊन जाते.त्याचसाठी वेळेचे महत्व दाखवण्यासाठी आम्ही Marathi quotes on time घेऊन आलो आहोत.हे अस्सल मराठी वेळ स्टेटस कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.

वेळ सुविचार | Time Status In Marathi

वाईट वेळ स्टेटस
वेळ ही वेळ असते
कधी चांगली तर कधी वाईट असते
यश आणि अपयशाची साक्षी असते 😃
वेळ ही खरच वेळ असते
राजा चे राजेपण आणि
गरिबांची गरिबी दाखवणारी वेळच असते
असते लहान पण शिकवते
मोठे ती पण वेळच असते 😇
वेळेसाठी एक वेळ काढावा लागेल
तरच कळेल वेळ ही खरच वेळ असते 🕒
Time Quotes In Marathi
बराच वेळ ते दोघे बोलत होते
ती म्हणाली "ए खूप उशीर झालाय रे 😃
आता शेवटची पाचच मिनिट बोलूयात."
तो हसत म्हणाला "असं गेल्या दोनतासात
चार वेळा हेच बोललीस काही उपयोग नाही."
दोघेही हसले आणि संवाद आणखी रंगला 🕒
वेळ मराठी स्टेटस
जे जे ज्या ज्या वेळी करायचे
ते ते त्या त्या वेळी करायचे 😇
कारण जीवनात पैसा, मित्र,
नाव, प्रसिद्धी, नोकरी, माया, प्रेम
सगळं सगळं परत मिळवता येतं
मात्र एक गोष्ट परत कधीच मिळवता येत नाही
ती म्हणजे गेलेली वेळ 🕒
वेळ सुविचार
बऱ्याच बऱ्या वाईट प्रसंगानंतर
येणारी अक्कल म्हणजे शहाणपण 😇
जी नंतर अनुभव या नावाने ओळखली जाते
जी कमावण्यासाठी वेळ नावाची अमूल्य वस्तू
परत न मिळणाऱ्या मुद्दल
आणि भांडवलासारखी खर्च करावी लागते 🕒
Time Status In Marathi
वेळ निघून गेली म्हणत
पश्चाताप करण्यापेक्षा 😃
उरलेल्या वेळेत असे प्रताप करा
की सर्वांनी तुमचा सन्मान केला पाहिजे 🕒
वाईट काळ मराठी स्टेटस
वेळ बदलली
सुखात सावली सारखी सोबत असणारी माणसं हि बदलली 😇
अगदी काल-परवापर्यंत आपली वाटणारी माणसं हि आज परकी झाली
बऱ्याच दिवसांचा 'हा आपला तो आपला' हा भ्रम हि नाहीसा झाला 😃
आता उरलाय तो भकास एकटेपणा असो
ती वेळ बदलली तशी हि पण वेळ बदलेल हे मात्र नक्की 🕒
वेळेला थोडासा वेळ देवून
जे होतय ते बघण्याची वेळ आहे सद्या तरी 🕒
हि नावं शोधत आहेे किनारा
कुणीकडे कशासाठी 😃
भेटेल तिला ध्येय तिचे
कधीतरी कुठेतरी
कदाचित असेल तिचा कावा 😇
सरीतेत बुडण्याचा
पण प्रवासी तिचा हरामखोर
म्हणे मी तर अंत तुझा
बुडवण्या निघालो संसार
तूझ्यासकट कधीचा ?
पण अजुन वेळ आहे़ 🕒
कोणतीच वेळ वाया नाही जात
एकतर शिकवते नाहीतर काहीतरी देते 🕒
जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो
कारण काळ जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही 🕒
Vel Quotes In Marathi
आता तिलाही उसंत नाही मलाही वेळ नाही 😃
जुळविलेल्या गणिताचा कुठलाच मेळ नाही
जोडणीत सरले आयुष्य कळले सोपा खेळ नाही
आंबड गोड म्हणायाला जगणे काही भेळ नाही 😇
सगळेच कसे मनाजोगे तेव्हा आता ती सुवेळ नाही
सूर हरवल्यावर ओठातून फुटत साधी शीळही नाही
आठवणी मोजत बसलो तर पडत आता पीळ नाही
चुकले कळून हातामध्ये उरला आता फार वेळ नाही 🕒
लोकांना समजावताना वेळ वाया जातो
स्वःताच्या मनाला समजावताना काळ वाया जातो 🕒
वेळ दिसत नाही पण
भरपूर काही दाखवून देते 🕒
वेळ चांगली नक्कीच येते 😇
पण ती वेळेवरच येते 🕒
आपण वेळेला वेळेवर वेळ दिला की
वेळ आपल्याला वेळेवर वेळ देते 🕒
Marathi thoughts on time
भीती वाटते कोणाला आयुष्यात जागा द्यायला कारण 😃
इथे वेळ आल्यावर लोक त्यांची जागा दाखवून देतात 🕒
अजून वेळ आहे अजून वेळ आहे म्हणत
कधी वेळ निघून गेली कळलंच नाय 🕒
वेळ बदलली तरी प्रेम
कधीच बदलत नसते 😇
श्वासाची डोर दोन जीवांची
काही केल्या तुटत नसते 🕒
वेळ स्टेटस मराठी
जेव्हा दमुन एकाकी बसलो होतो
लोकं म्हणाले हा तर इथेच संपलाय 😇
मी म्हणालो त्यास आयुष्याचा संघर्ष आता कुठे सुरू झालाय
अजून मला खडतर प्रवास पार करायचं "अजून वेळ" आहे 🕒
सतत पुढे सरणारा वेळ ती
तिच्या आठवणीत रमणारा भूतकाळ तो 🕒
इथं वेगवेगळे मुखवटे अन्
रंग घेऊन जगतात माणसं, 😇
सरड्यालाही रंग बदलण्यात
मागं टाकतात माणसं 🕒
अजून वेळ आहे, खूप काही करण्यासाठी
स्वतःमधलं सामर्थ्य, सिद्ध करून दाखवण्यासाठी
अजून वेळ आहे ,स्वप्नांचा गाव सजवण्यासाठी 😇
संकटावर ध्यैर्याने मात करून, त्यांना सामोरं ठाकण्यासाठी
अजून वेळ आहे, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी
सृष्टीवर जो मांडलाय विनाशाचा डाव, त्या विनाशाला आळा घालण्यासाठी
अजून वेळ आहे, माणसातलं माणूसपण ओळखण्यासाठी 😃
न भेद करता माणसा-माणसांमध्ये, माणुसकीचं रोपटं पेरण्यासाठी
अजून वेळ आहे, पण तो थांबणारही नाही
म्हणूनच गरज आहे आज, त्या वेळेतच सगळं सावरण्याची 🕒

वेळ सुविचार | Time Status In Marathi

Quotes on time in marathi
वेळ बदलली की
माणसं सरड्याप्रमाणे रंग बदलतात
आपलं काम साध्य झाले की
इतरांना सहज दूर लोटतात
वेळ बदलली की 😇
माणसं स्वतःच्या मनासारखी वागतात
ज्यांची असायची गरज
तीही मग त्यांना लगेच खटकतात
वेळ बदलली की
माणसं सार काही विसरतात
स्वतःच्या स्वार्थापुढे 😃
ज्यांनी मदत केली त्यांनाच दुर्लक्षित करतात
वेळ बदलली की
माणसं क्षणांत बदलून जातात
प्रत्येकाची वेळ नक्की येते
हे मात्र ना लक्षात ठेवतात 🕒
संवाद नेहमी प्रमाणे फार काळ रंगला होता.
ती निरोप घेत लाडिक आवाजात म्हणाली 😃
"हल्ली कमी वेळ असतो तुला माझ्यासाठी?"
तो हसत म्हणला "हल्ली वेळच कुठे उरतो तुझ्याशिवाय इतरांसाठी!"
एक कळी लाजत खळीत विसावली 🕒
वेळ आणि व्यक्ती हे
कधी हातातुन निसटून जाईल
याची खात्री नाही राहात 🕒
मनात जे काही आहे ते बोलायला शिका वेळेवर
नाहीतर आज सांगतो उद्या सांगतो करत वेळ कधीच येणार नाही
आणि भरलेली ओंजळ रिती भासेल 🕒
ही वेळ तुला आठवण्याची
तुझ्या भासाला कवटाळण्याची
सारा दिवस तुझ्या आठवणींचा
सारी रात्र तुला साठवण्याची 😇
आता वेळेलाच सांगायला पाहिजे
सवय मोड तुला मिरवण्याची
आता काय काय करत असशील
उगा सवय मनाला भुलवण्याची 😃
तू तुझ्या जगात मश्गुल असशील
इथे शर्यत तुला आठवण्याची
ही वेळ तुला आठवण्याची
वेळच नाही तुला विसरण्याची 🕒

वाईट काळ मराठी स्टेटस | Vel Quotes In Marathi

वेळ स्टेटस
जरी संकटे आली कितीही
तरी ठाम उभं रहायचं
असं कन्हत राहण्यापेक्षा 😇
वेळेला हसत सामोरं जायचं
वेळ केंव्हाही बदलेल
सुख-दुःखाचा खेळ असतो हा सारा
मनाने खचू नकोस वेड्या 😃
बदलेल तो दिवस आणि
दिसेल तुलाही तूझ्या आयुष्याचा किनारा 🕒
जे आहे जवळ या वेळी त्याला जोपासायला शिका
वेळ निघून गेल्यावर सांत्वन करण्या एवजी काही उरतच नाही 🕒
वेळीच दुःखाला सावरायचं असतं
वेळेनुसार दुःखाला आवरायचं नसतं 😇
कारण सुखाला थोडं थोपवता येतं
दुःखाला मात्र वेळीच ढळू दयावं लागतं 🕒
अबोल असूनही खुप काही बोलून गेली
ती वेळ आहे 😃
जी जाता जाता जगण्याच अर्थ
समजाऊन गेली 🕒
Time shayari marathi
रात्र संपायला
अजून वेळ आहे
तुला विसरायला 😇
अजून वेळ आहे
नाही जाणार सहज
तुझी आठवण वेडे
मला संपायला
अजून वेळ आहे 🕒
हि वेळही बहुधा प्रेमात पडली
इतकी बेचैनी कि थांबतच नाही 🕒
एक वेळ कुठलीही गोष्ट करायला चुकलात तरी चालेल
पण माणसं ओळखायला कधी चुकू नका 🕒
वेळ बदलली,माणसं बदलली
माणसांसोबत गरजा बदलल्या 😇
मित्र बदलले, त्यांची मैत्री बदलली
आठ्वणी मात्र तश्याच राहिल्या 🕒
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायला ही वेळ लागत नाही 😃
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला 🕒
Marathi quotes on time
वेळ चांगली असेल
तर सगळे आपले असतात 😃
आणि वेळ खराब असेल
तर आपले पण परके होतात 🕒

आम्हाला आशा आहे कि Marathi thoughts on time | वाईट वेळ स्टेटस मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मराठी स्टेटस जीवन {Bad time status in marathi}, रॉयल मराठी स्टेटस {Time marathi status} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले शांत स्वभाव स्टेटस मराठी {Time shayari marathi}, विश्वास घात स्टेटस मराठी {Self respect quotes in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post