पाऊस कविता मराठी । Rain Poem In Marathi । Paus Kavita In Marathi

पाऊस कविता मराठी {5 Short poems on rain in marathi} आणि पावसाच्या कविता {Paus marathi kavita} जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या सुंदर लेख मराठीत सर्वोत्कृष्ट पहिला पाऊस कविता {Marathi poem on rain} पाहायला मिळतील.पाऊस हा प्रत्येकालाच आवडतो अश्याच पावसावर कविता {Pahila paus kavita in marathi} किंवा पावसा विषयी कविता {Marathi rain poems} या लेखात वाचू शकता.मराठी पावसाळी कविता {Marathi kavita on nature and rain} वाचून तुम्हाला हि खूप आनंद होईल तर.आशा आहे कि आपल्याला हे पाऊस स्टेटस {Rain poems in marathi} जरूर आवडले असतील.

आपल्या स्टेटस वर ठेवण्यासाठी Marathi poems on rain by mangesh padgaonkar ,Rainy season poem in marathi ,Marathi poems on rain for std 7 किंवा Poem of rain in marathi आपल्याला नक्कीच आवडतील.तरी हे Pahila paus kavita आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका.


Rain Poem In Marathi

पाऊस कविता मराठी- पुन्हा कालचा पाउस

आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल

कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय

पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप

आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस

खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- पाऊस गातो गाणे

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


Paus Kavita In Marathi- पाऊस आलाय?

पाऊस आलाय?.भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- माझा पाऊस

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे

माझ्यासाठी पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण पाऊस बाहेर पडत रहायचा
माझ्या आईचे पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे

तोच पाऊस मला आठवतो
तोच पाऊस मला माहित आहे
माझ्यासाठी पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष, अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप माझ्या आईचा
पाऊस म्हणजे माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन थेंबांचा
आणि माझ्या गेलेल्या आईच्या आठवणींचा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- पाऊसप्तक

ढगांची पळपळ
थेंबाची ओंजळ

मृदेची सळसळ
बेधुंद तो दरवळ
पहिला थेंब खेळ
छतावरून घरंगळ

उतारावर ओघळ
पाखरांची अंघोळ
सांज पाऊस वेळ
पोरांचे पाण खेळ

मळभ अंधारखेळ
विजेची बंद वेळ

लोकांची पळपळ
वाहनांची वर्दळ
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


पाऊस कविता मराठी- माझे असे कसे?

पाऊस कोसळे हा
अंधारले दिसे
डोळे भरून आले
माझे असे कसे?

गेल्या बुडून वाटा
गेली बुडून राने
झाले उदास गाणे
माझे असे कसे?

या पावलांस लाटा
ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती
माझे असे कसे?

का सांग याद येते?
एकांत हा सभोती
हे सूर डोह होती
माझे असे कसे?
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- बाहेर बरसती धारा रे

मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे

स्थिर अचल दिशांतुन दाही
निःशब्द वेदना काही
का व्याकुळ आज किनारा रे
बाहेर बरसती धारा रे

हे मुक्त अनावर सगळे
आकाश इथून मज दिसले
घर गमे आज मज कारा रे
बाहेर बरसती धारा रे

मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाउन
मडके गेले वाहुन!
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜


पाऊस कविता मराठी- पाऊस

चिंब भिजुन पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण-धवल जगात

विजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गांव

कधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची
कधी साथ तिस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- पावसा

का रं पावसा असा
कहर अवेळी मांडला?
शेतकरी राजा माजा
पार ओरबाडूनी गेला !

ग्याल सारं पिकपाणी
स्वप्न पण विखुरली,
घामाची, कष्टाची त्याज्या
झोळी पण रीती झाली !

नको रं असा कोसळु
ठेव जाणिव लेकरांची,
ऐकलसा खुप शिव्याशाप
आता घे दुवा तरी त्यांची !

झाल गेलं तो विसरतो
जुपल पुन्हा तो कामाला,
दिवु नकोस रं तू दगा
अजाबात पुढल्या वक्ताला !
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

पाऊस कविता मराठी- पाऊस

एकदा पावसाने तुला विचारले.
साधारण कधी येऊ?
तर तू म्हणालीस,
-इच्छा नसताना.

पावसात तू जितकी चिंब भिजायचीस
तितकीच माझ्याकडे येताना कोरडी.
मग तूच मला गोष्ट सांगितलीस,
आपण दोघं ज्या कागदी नावेवर बसलो होतो
ती उलटल्याचई.

नंतर पावसाचे आणि तुझे वैर झाले.
तो वेगळ्याच टापूत बरसू लाघला
आणि तू वेगळ्या
मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा
आतून झिरपू लागलो.

नंतर नंतर
पाऊस आलच नाही
कधी तरी येईन एवढंच म्हणाला आणि
बी रुजल्यानंतरचं वाट पाहणं
आपण दोघाणि स्वीकारलं
समजूतदारपणे.
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

Rain Poem In Marathi- आवडता पाऊस

मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..
कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..
हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..
लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस!!

कधी धो-धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस..
स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस..
तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस..
चिंब-चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस!!

अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस..
मातीला भिजवून सुगंध देऊन जाणारा तो पाऊस..
भान हरवून टाकणारा तो पाऊस..
हवा-हवासा वाटणारा तो पाऊस!!


पाऊस कविता मराठी- पाऊस

पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
आपण कितीही कोरडे असलो
तरी पाण्यासारख वहाव

वाहून न्याव्यात कधी कागदाच्या बोटी
बरसण्यासाठी मिळतात नाणीही खोटी
कधी असच छोट्या सुखासाठी झगडावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं

अंगणी चिखल होतो कधी कधी
पण त्यामुळेच बहरतात पेरलेली दाणी
कधी येतो पूर, कधी वाहून जातात गायी
पण समतोलासाठी कधी अस पण करावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜

आम्हाला आशा आहे कि बाल कविता संग्रह मराठी | जुन्या कविता मराठी | Marathi kavita paus ani prem आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Poem in marathi on rain,Marathi kavita paus ,लहान मुलांवर कविता,Short poem on rain in marathi ,Poem marathi असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi poems on rain for students ,पाऊस आला ,Pavsala poem in marathi ,Pavsachi kavita in marathi ,Pavsachya kavita आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

१००००+ Text Faces (✿ ꈍ‿ꈍ)˘ε˘˶ ⋐)

Post a Comment

Previous Post Next Post