मराठी म्हणी ओळखा | Marathi Mhani | मराठी म्हणी

मराठी म्हणी ओळखा

Proverbs In Marathi : नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट म्हणी व त्याचे अर्थ {Marathi mhani} दिलेले आहेत.मराठी म्हणी ओळखा {Vakprachar in marathi} खेळल्याने आपला वेळ छान तर जातोच पण आपली मैत्री हि अजून घट्ट होते. ह्या इंटरनेटच्या युगात हा ऐतिहासिक मराठी म्हणी ओळखा खेळ खूप कमी झाला आहे.आपले मित्र किती हुशार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्याना वाक्प्रचार म्हणजे काय किंवा म्हणी पूर्ण करा {Proverbs english to marathi} पाठवा आणि त्याची मजा घ्या.

ओळखा पाहू म्हणी मराठी पाहण्यासाठी तुम्ही मराठी वाक्प्रचार {Marathi proverbs} किंवा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग आपण मित्र मैत्रिणींना पाठवू शकतो.तर आशा आहे कि आपल्याला हे 50 Marathi proverbs किंवा Puzzle questions in marathi जरूर आवडले असतील.


मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Mhani In Marathi

    Marathi Mhani
  1. अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय
    अर्थ- जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत.✔

  2. अति शहाणा त्याचा बैल रिकामा
    अर्थ- शिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते.✔

  3. आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते
    अर्थ- एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा.✔

  4. आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते
    अर्थ- एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा.✔

  5. आगीतून निघून फुफाट्यात पडणे
    अर्थ- एका संकटातून निघून दुसर्‍या संकटात सापडणे.✔

  6. आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायच
    अर्थ- स्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा.✔

  7. आले अंगावर घेतले शिंगावर
    अर्थ- संकटाचा सामना धैर्याने करावा.✔

  8. आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी
    अर्थ- गरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे.✔

  9. आलिया भोगासी असावे सादर
    अर्थ- आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.✔


  10. मराठी म्हणी
  11. उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठी
    अर्थ- मनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो.✔

  12. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
    अर्थ- एखाद्या चांगल्या गोष्टीचा ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये.✔

  13. एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही
    अर्थ- एकसारखे अनेक स्त्रोत उपलब्ध असता काम थांबत नाही किंवा श्रीमंत व्यक्तीचा काही पैसा खर्च झाला तरी त्याचा परिणाम होत नाही.✔

  14. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
    अर्थ- एकाच माणसाचा भरपूर लोकाना त्रास होणे.✔

  15. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही
    अर्थ- अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे.✔

  16. एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये
    अर्थ- एकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही.✔

  17. मराठी म्हणी संग्रह व अर्थ
  18. कडू कारले तुपात तळले,साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूच
    अर्थ- वाईट व्यक्तीचीवाईट सवय कधीही जात नाही.✔

  19. करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव
    अर्थ- एकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे.✔

  20. कानामागून आली तिखट झाली
    अर्थ- नवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे.✔

  21. कोल्हयाला द्राक्षे आंबटच
    अर्थ- न मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवीणे.✔

  22. कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाहीलपत नाही
    अर्थ- सत्य कधीही लपत नाही.✔

  23. गाढवापुढे वाचली गीता ,कालचा गोंधळ बरा होता
    अर्थ- चांगले ज्ञानदिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे.✔

  24. अंगाची लाही लाही होणे
    अर्थ- खूप संतापणे.✔

  25. अंगाची तलखी होणे
    अर्थ- खूप संतापणे.✔

  26. अंतकाळापेक्षा मध्यांन्नकाळ कठीण
    अर्थ- मरणापेक्षा भुकेच्या यातना कठीण असतात.✔

  27. अंधारात केले तरी उजेडात आले
    अर्थ- गुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वाना कळू शकते.✔

  28. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
    अर्थ- नावाप्रमाणे लोक नसतात.✔

  29. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?
    अर्थ- एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे.✔

  30. अंगाचा तीळ पापड होणे
    अर्थ- खूप संतापणे.✔

  31. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ
    अर्थ- दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.✔

  32. Mhani In Marathi
  33. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
    अर्थ- अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.✔

  34. आंधळीपेक्षा तिरळी बरी
    अर्थ- एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले.✔

  35. आंधळ्या प्रजेत हेकणां राजा
    अर्थ- असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो.✔

  36. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
    अर्थ- अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.✔

  37. आंधळीपेक्षा तिरळी बरी
    अर्थ- एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले.✔

  38. अंथरूण पाहून पाय पसरावे
    अर्थ- आपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे.✔

  39. अक्कल खाती जमा
    अर्थ- नुकसान होणे.✔


  40. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा
    अर्थ- क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे.✔

  41. अचाट खाणे मसणात जाणे
    अर्थ- अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते.✔

  42. आचार भ्रष्ट नि सदा कष्ट
    अर्थ- अनाचाराने वागणारा माणूस सदा दु:खी असतो.✔

  43. आजा मेला नि नातू झाला
    अर्थ- एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार.✔

  44. आठ हात काकडी नउ हात बी
    अर्थ- एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे.✔

  45. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार
    अर्थ- एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.✔

  46. आधणातले रडतात अन सुपातले हसतात्त
    अर्थ- दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते.✔

  47. अठरा विश्वे दारिद्र असणे
    अर्थ- अति दुर्बळ असणे.✔

  48. अडला नारायण गाढवाचे पाय धरी
    अर्थ- बलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो.✔

  49. अडली गाय अन फटके खाय
    अर्थ- अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे.✔

  50. मराठी म्हणी pdf
  51. अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा
    अर्थ- मूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो.✔

  52. आपलेच दात अन आपलेच ओठ
    अर्थ- आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे.✔

  53. आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोर
    अर्थ- आपल्या भागात आपला वरचष्मा ठेवणे.✔

  54. आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे
    अर्थ- मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते.✔

  55. आयत्या पिठावर रेखोट्या मारणे
    अर्थ- कोणतेही काम न करता दुसर्‍याच्या जिवावरउपभोग घेणे.✔

  56. आरोग्य हेच ऐश्वर्य
    अर्थ- चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे.✔

  57. आली चाळीशी, करा एकादशी
    अर्थ- परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलवणे.✔

  58. अति राग भीक माग
    अर्थ- क्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही.✔

  59. अतिपरीचयेत अवज्ञा
    अर्थ- अतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो.✔

  60. अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही
    अर्थ- एखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही.✔

  61. अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये
    अर्थ- गरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो.✔

  62. अपयश हे मरणाहून वोखटे
    अर्थ- अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.✔

  63. अप्पा मारी गप्पा
    अर्थ- काही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात.✔

  64. असतील शिते तर नाचतील भुते
    अर्थ- संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात.✔

  65. आचार तेथे विचार
    अर्थ- चांगली संस्कृती चांगल्या विचाराना जन्म देते.✔

  66. आज अंबरी उद्या झोळी धरी
    अर्थ- कधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे.✔

  67. आठ पुरभय्ये अन नऊ चौबे
    अर्थ- जमत नसल्यास सगळ्यांची चूल वेगवेगळी असते.✔

  68. आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी
    अर्थ- एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे.✔

  69. Marathi Mhani List
  70. आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असते
    अर्थ- अशक्य गोष्टींची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो.✔

  71. आधी करावे मग सांगावे
    अर्थ- कार्य तडीस गेल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये.✔

  72. आधी पोटोबा मग विठोबा
    अर्थ- अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे.✔

  73. अडाण्याची गोळी भल्यास गिळी
    अर्थ- अशिक्षीत माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो.✔

  74. अडला हरी गाढवाचे पाय धरी
    अर्थ- अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते.✔

  75. अडली गाय खाते काय
    अर्थ- गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो.✔

  76. अति तेथे माती
    अर्थ- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते.✔

  77. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
    अर्थ- आधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे.✔

  78. आपण चिंतीतो एक पण देवाच्या मनात भलतेच
    अर्थ- प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही.✔

  79. आपण सुखी तर जग सुखी
    अर्थ- आपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटणे.✔

  80. आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटं
    अर्थ- स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे.✔

  81. आपली पाठ आपणास दिसून येत नाही
    अर्थ- आपले दोष आपल्याला दिसत नाहीत.✔

  82. आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ
    अर्थ- आपली परिस्थिती चागली नसताना दुसऱ्याच्या परिस्थिती विषयी कळकळ दाखविणे .✔

  83. अती झालं अऩ हसू आलं
    अर्थ- एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते.✔

  84. आसू ना मासू , कुत्र्याची सासू
    अर्थ- जिव्हाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे.✔

  85. इकडे आड तिकडे विहीर
    अर्थ- दोन्ही बाजूनी संकटात सापडणे.✔

  86. इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होते
    अर्थ- सर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोकं धनवान झाले असते.✔

  87. इज्जतीचा फालुदा होणे
    अर्थ- अपमान होणे.✔

  88. इकडे आड तिकडे विहीर
    अर्थ- कोंडी होणे.✔

  89. इच्छा तसे फळ
    अर्थ- मनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच.✔

  90. अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये
    अर्थ- अपरिचित माणसाशी अधिक सलगी करू नये.✔

  91. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे
    अर्थ- कोणत्याही यश मिळवताना सुरवातीला अपयश येऊ शकते.✔

  92. अपुऱ्या घड्याला डब
    अर्थ- डब फार कमी बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्वदूर सांगत सुटतो.✔

  93. असंगाशी संग प्राणाशी गाठ
    अर्थ- अयोग्य माणसाची सांगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो.✔

  94. उठता लाथ बसता बुक्की
    अर्थ- कायम धाकात ठेवणे.✔

  95. उडदामाजी काळे
    अर्थ- बेरे चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्ट असु शकते.✔

  96. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
    अर्थ- एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे.✔

  97. उथळ पाण्याला खळखळाट फार
    अर्थ- अपरिपक्व ज्ञान असणारा व्यक्ती उगाच ज्ञानप्रदर्शन करतो.✔

  98. उधार तेल खावत निघाले
    अर्थ- उधारीच्या मालत काही न काही दोष असतो.✔

  99. उन पाण्याने घर जळत नसते
    अर्थ- एखाद्यावर खोटे आरोप केले तरी त्याची बेअब्रू होत नाही.✔

  100. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा
    अर्थ- भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे.✔

  101. मराठी म्हणी व वाक्प्रचार
  102. आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली
    अर्थ- अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते.✔

  103. आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ
    अर्थ- एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे.✔

  104. उत्तम शेती मध्यम व्यापार नि कनिष्ठ नोकरी
    अर्थ- नोकरी पेक्षा व्यापार व व्यापारापेक्षा शेती उत्तम आहे.✔

  105. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी
    अर्थ- उद्योगी मनुष्य जीवनात यशस्वी होतो व त्याची भरभराट होते.✔

  106. उधारीचे पाते अन सव्वा हात रिते
    अर्थ- उधारीने घेतलेला माल मग कमीच भरणार.✔

  107. उपट सूळ, घे खांद्यावर
    अर्थ- नसते लचांड पाठीमागे लावून घेणे.✔

  108. उभारले राजवाडे अन तेथे आले मनकवडे
    अर्थ- श्रीमंती आले की त्यामागे हाजी हाजी करणारे येतातच.✔

  109. आंधळ्या प्रजेत हेकणां राजा
    अर्थ- असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो.✔

  110. Proverbs In Marathi
  111. असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा
    अर्थ- भरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे.✔

  112. उभ्याने यावे अन ओणव्याने जावे
    अर्थ- कोणतेही काम स्वाभिमानाने करावे त्याचे श्रेय नम्रपणाने घ्यावे.✔

  113. उसाच्या पोटी कापूस
    अर्थ- कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे.✔


  114. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा
    अर्थ- बाह्य स्वरूपावरून व्यक्तीच्या स्वभावाची पारख करता येत नाही.✔

  115. ऋषीचे कुळ अन हरळीचे मुळ शोधू नये
    अर्थ- ऋषी अन महान अज्ञात गोष्टींचे मुळ शोधायचा प्रयत्न करू नये.✔

  116. एक घाव दोन तुकडे
    अर्थ- एका फटक्यात निकाल लावणे.✔

  117. एक नूर आदमी दस नूर कपडा
    अर्थ- माणसाचा रुबाब नीटनेटक्या पोशाखाने वाढतो.✔

  118. आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आली
    अर्थ- अक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते.✔

  119. एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेच
    अर्थ- लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.✔

  120. एकावे जनाचे करावे मनाचे
    अर्थ- सर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा.✔

  121. एका कानाने एकवे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे
    अर्थ- ऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे.✔

  122. एका दगडात दोन पक्षी मारणे
    अर्थ- एकाच कार्यात दोन काम करणे.✔

  123. एका माळेचे मनी
    अर्थ- सर्वजण येथून तेथून सारखे.✔

  124. आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ
    अर्थ- एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे.✔

  125. आई जेवू घालीना बाप भिक मागू देईना
    अर्थ- दोन्हिकडून संकटात सापडणे.✔

  126. आईचा काळ नि बायकोशी मवाळ
    अर्थ- आईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे.✔

  127. आईजीच्या जिवावर बाईजी उदार
    अर्थ- दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.✔

  128. आकारे रंगती चेष्टा
    अर्थ- माणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याचा कार्याचा अंदाज करता येत नाही.✔

  129. आखुड शिंगी आणि बहुदुधी
    अर्थ- सर्व आपल्या मनासारखे व्हावे असे वाटणे.✔

  130. एक ना धड भारभार चिंध्या
    अर्थ- अनेक गोष्टी अपूर्ण करून , कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे.✔

  131. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
    अर्थ- दोन मार्गांवर हात ठेऊन चालणे.✔

  132. एकटा जीव सदाशिव
    अर्थ- एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो.✔

  133. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
    अर्थ- एकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो.✔

  134. एका हाताने टाळी वाजत नाही
    अर्थ- दोष दोन्हीकडे असतो.✔

  135. एकादशी अन दुप्पट खाशी
    अर्थ- नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.✔

  136. एकूण घेत नाही त्याला सांगू नये काही
    अर्थ- जो एकात नाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये.✔

  137. ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ
    अर्थ- कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात.✔

  138. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे
    अर्थ- दुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतःघेणे.✔

  139. आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी
    अर्थ- आधी वर्तन बिघडते मग मनुष्य कंगाल होतो.✔

  140. आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊस
    अर्थ- एखाद्या अचानक ठरलेल्या गोष्टीत बाधा उत्पन्न होणे.✔

  141. आधीच मर्कट तशातच मद्य प्याला
    अर्थ- आधीच विचित्र बुद्धीचा,अन अवास्तव प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्याच्या चेष्टाना उत येतो.✔

  142. म्हणी व त्याचे अर्थ
  143. आपण हसे लोकाला अन घाण आपल्या नाकाला
    अर्थ- ज्या दोषाबद्दल लोकास हसायचे, तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे.✔

  144. आपला हात जगन्नाथ
    अर्थ- आपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते, आपल्या हातात अधिकार आला तर त्याचा दुरुपयोग करून जिन्नस लाटणे.✔

  145. कधी तुपाशी तर कधी उपाशी
    अर्थ- पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे.✔

  146. कर नाही त्याला डर कशाला
    अर्थ- दोषी नसताना कसलेही भय राहत नाही.✔

  147. करवंदीच्या जाळीला काटे
    अर्थ- चांगल्या वस्तूबरोबर वाईट गोष्टींचा सामना करावयास लागायचाच.✔

  148. करायला गेलो एक आणि झाले भलतेच
    अर्थ- चांगले करायला गेले तरी वाईट घडणे.✔

  149. करून करू भागले अन देवपूजेला लागले
    अर्थ- वाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे.✔

  150. कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीती गोड
    अर्थ- दुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात तर गुणवतीला प्रेम आवडते.✔

  151. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून
    अर्थ- आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पणनुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे.✔

  152. कळते पण वळत नाही
    अर्थ- चांगल्या गोष्टी कृतीत आणता येणे कठीण आहे.✔

  153. कशात काय अन फाटक्यात पाय
    अर्थ- बडेजाव दाखविला तरी उपयोग नसतो.✔

  154. काखेत कळसा गावाला वळसा
    अर्थ- जवळ असलेली वस्तू सर्वदूर शोधणे.✔

  155. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
    अर्थ- खरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही.✔

  156. काम न धंदा, हरी गोविंदा
    अर्थ- रिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो.✔

  157. आशेची माय निराशा
    अर्थ- निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये.✔

  158. आस्मान दावणे
    अर्थ- पराजय करणे.✔

  159. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
    अर्थ- दोन्ही बाजूंनी अडचण.✔

  160. आईची माया न पोर जाई वाया
    अर्थ- अति लाडाने मुल बिघडते.✔

  161. आकांक्षापुढती गगन ठेंगणे
    अर्थ- आशावाद ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य होते.✔

  162. आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत
    अर्थ- माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते.✔

  163. काम नाही घरी अन सांडून भरी
    अर्थ- काम नसताना उगाच काम वाढवून तेच काम परत परत करणे.✔

  164. काय ग बाई उभी घरात दोघी तिघी
    अर्थ- घरात काम करणारे पुष्कळ वाढले की प्रत्येकजण कामचुकारपणा करू लागतो.✔

  165. काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाची
    अर्थ- सर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते.✔

  166. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
    अर्थ- दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही.✔

  167. कुंपणानेच शेत खाणे
    अर्थ- रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे.✔

  168. कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची
    अर्थ- तट्टाणी माणसाची तुलना दुर्बळ माणसाशी होऊ शकत नाही.✔

  169. कुठेही जा पळसाला पाने तीनच
    अर्थ- सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.✔

  170. कुन्हाडीचा दांडा गोतास काळ
    अर्थ- दुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते.✔

  171. कुसंतानापेक्षा नि:संतान बरे
    अर्थ- वाईट मुले पोटी जन्मल्यापेक्षा मुले जन्मालान आलेली चांगली.✔

  172. केली खाता हरखले व हिशेब देता कचरले
    अर्थ- कोणताही विचार न करता कर्ज करायचे व देणी वाढली की काळजी करायची.✔

  173. आपल्या अळवाची खाज आपणास ठावी
    अर्थ- आपले दोष आपल्यालाच माहित असते.✔

  174. आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे
    अर्थ- इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे.✔

  175. आमचे गहू आम्हालाच देऊ
    अर्थ- आपल्याच वस्तूचा चतुराईने दुसऱ्याना लाभ न मिळू देता स्वतःच लाभ घेणे.✔

  176. आयत्या बिळावर नागोबा
    अर्थ- कोणतेही काम न करता दुसर्‍याच्या जिवावर उपभोग घेणे.✔

  177. आलीया भोगासी असावे सादर
    अर्थ- अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.✔

  178. आवळा देऊन कोहळा काढणे
    अर्थ- अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.✔

  179. कोळसा उगाळावा तेवढा काळा
    अर्थ- वाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो.✔

  180. Marathi mhani
  181. कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाही
    अर्थ- सत्य कधीही लपत नाही.✔

  182. कोल्हा काकडीला राजी
    अर्थ- लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात.✔

  183. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे
    अर्थ- अधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते.✔

  184. खतास महाखत
    अर्थ- प्रत्येक वाईट माणसास दुसर वरचढ माणूस मिळतोच.✔

  185. खाजवून खरुज काढणे
    अर्थ- एखाद्याची उगाचच कुरापत काढणे.✔

  186. खाण्याराला चव नाही रांधणारयाला फुरसत नाही
    अर्थ- एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की ती गोष्ट मुक्तपणे सहन करणे भाग असते .✔

  187. खायला काळ भुईला भार
    अर्थ- ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.✔

  188. खायला कोंडा निजेला धोंडा
    अर्थ- अत्यंत दारिद्य असणे.✔

  189. खाल्ल्या घराचे वासे मोजणे
    अर्थ- ज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे.✔


  190. खिळ्यासाठी नाल गेला अन नालीसाठी घोडा
    अर्थ- व्यवस्थित नियोजन नसल्याने अपरिमित नुकसान होणे.✔

  191. इजा बिजा तीजा
    अर्थ- एकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही.✔

  192. उंटावरचा शहाणा
    अर्थ- मूर्ख सल्ला देणारा.✔

  193. उंटावरून शेळ्या हाकणे
    अर्थ- आळस, हलगर्जीपणा करणे.✔

  194. उंदराला मांजर साक्ष
    अर्थ- वाईट माणसाने दुसर्‍या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे.✔

  195. उकराल माती तर पिकतील मोती
    अर्थ- शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात.✔

  196. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला
    अर्थ- एखादे मोठे , कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमांचा विचार करायचा नसतो.✔

  197. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला
    अर्थ- एक लहान पत असलेली व्यक्ती दुसऱ्या गरीब व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही. .✔

  198. उचलली जीभ लावली टाळुला
    अर्थ- कोणताही विचार न करता बोलणे.✔

  199. गरिबान खपाव ,धनिकान चाखाव
    अर्थ- जीवावर कोणीही बलाढ्य दुबळ्या माणसाच्या आपला फायदा करून घेतो.✔

  200. ग ची बाधा झाली
    अर्थ- फाजील आत्मविश्वास बळावणे.✔

  201. गंगेत घोडं न्हालं
    अर्थ- सर्व इच्छा पूर्णत्वास जाणे.✔

  202. गतं न शौच्यम
    अर्थ- एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे .✔

  203. मराठी म्हणी ओळखा
  204. उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड
    अर्थ- छोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही.✔

  205. उंटावरचा शहाणा
    अर्थ- मूर्ख सल्ला देणारा.✔

  206. उंटावरून शेळ्या हाकणे
    अर्थ- कोणत्याही कामात सहभाग न घेता उगाच फुकटाचे मार्गदर्शन करणे.✔

  207. गाव करी ते राव न करी
    अर्थ- एकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते व त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा साध्य होतात.✔

  208. गावात घर नाही अन रानात शेत नाही
    अर्थ- कफल्लक असणे, दरिद्री असणे.✔

  209. गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्ली
    अर्थ- एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झालातर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे.✔

  210. गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ
    अर्थ- मुखं मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो.✔

  211. उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते
    अर्थ- गरीब व्यक्तीचे दिवस कधीही पालटू शकतात.✔

  212. उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही
    अर्थ- धडधडीत नुकसान होत असताना न प्रतिकार करता माणसाला स्वस्थ बसवत नाही.✔

  213. उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती
    अर्थ- मुद्द्याचे काम सोडून भलतीच चौकशी करणे.✔

  214. उचलली जीभ लावली टाळ्याला
    अर्थ- बेताल बोलणे.✔

  215. उडत्या पक्षाची पिसे मोजणे
    अर्थ- सहज चालता बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे.✔

  216. उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक
    अर्थ- एखाद्या गोष्टीची पारख लगेचच होत नाही त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो .✔

  217. घरचा उंबरठा दारालाच माहित
    अर्थ- घरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते.✔

  218. घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळ
    अर्थ- गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.✔

  219. घरोघरी मातीच्या चुली
    अर्थ- सर्वदूर सारखीच परिस्थिती असते.✔

  220. घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपान
    अर्थ- काम न करता फक्त दिखाउपणा प्रदर्शित करणे.✔

  221. घरात नाही कौलान रिकामा डौल
    अर्थ- गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.✔

  222. उसाबरोबर एरंडाला पाणी
    अर्थ- एखाद्या गोष्टीचा लाभ अनपेक्षितरीत्या दुसऱ्या जवळच्या गोष्टीला होतो.✔

  223. उपसा पसारा मग देवाचा आसरा
    अर्थ- आधी कामा करावे मग देव देव करावे.✔

  224. घोडं झालया मराया अन बसणारा म्हणतो मी नवां
    अर्थ- दुसऱ्याचे दु:ख न पाहता आपलाच विचार करणे.✔

  225. घोडे खाई भाडे
    अर्थ- एखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे.✔

  226. चकाकते ते सोने नसते
    अर्थ- # बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात.✔

  227. चतुर्भुज करणे
    अर्थ- अटक करणे.✔

  228. चमडी जाईल पण दमडी जाणार नाही
    अर्थ- पैश्यावर खूप प्रेम असणे, कंजूष असणे.✔

  229. चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा
    अर्थ- चांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी.✔

  230. Proverbs english to marathi
  231. चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडी
    अर्थ- एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे.✔

  232. चालत्या गाडीला खीळ घालणे
    अर्थ- एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे.✔

  233. चिंती परा ते येई घरा
    अर्थ- वाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते.✔

  234. चुकणे हा मानवाचा धर्म आहे
    अर्थ- मनुष्य प्राणी हा चुकू शकतो.✔

  235. एका म्यानात दोन तलवारी राहत नाही
    अर्थ- लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.✔

  236. एका हाताने टाळी वाजत नाही
    अर्थ- भांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते.✔

  237. एकादशीच्या घरी शिवरात्र
    अर्थ- एका दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.✔

  238. एकी हेच बळ
    अर्थ- एकत्र समुदाय कायम जिंकतो.✔

  239. एरंडाचे गुर्हाळ
    अर्थ- एखादी गोष्ट लांबलचक व कंटाळवाणी असणे.✔

  240. चोर सोडून संन्याश्याला फाशी
    अर्थ- अपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे.✔

  241. चोराच्या मनात चांदणे
    अर्थ- वाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो.✔

  242. चोरावर मोर
    अर्थ- प्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच.✔

  243. छडी लागे छमछम विद्या येई घमघम
    अर्थ- कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते.✔

  244. छत्तीसाचा आकडा
    अर्थ- विरुद्ध मत असणे.✔

  245. एका कानावर पगडी घरी बाईल उघडी
    अर्थ- बाहेर श्रीमंतीचा आव आणायचा व घरी दारिद्र्यात राहणे.✔

  246. एका पुताची माय वळचणीखाली जीव जाय
    अर्थ- एक मुलगा पोटी असून सुद्धा तोआईला सुखाने जगू देत नाही.✔

  247. एका माळेचे मनी ओवायला नाही कुणी
    अर्थ- सर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही.✔

  248. ओठात एक नि पोटात एक
    अर्थ- प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.✔

  249. ओढाळ गुराला लोढणे गळ्याला
    अर्थ- गुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसावयास हवा.✔

  250. जखमेवर मीठ चोळणे
    अर्थ- आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे.✔

  251. जळत घर भाड्याने कोण घेणार?
    अर्थ- संकटग्रस्त गोष्ट कोणालाच आवडत नाही.✔

  252. जशास तशे
    अर्थ- समोरच्या व्यक्ती व्यवहारानुसार आपला व्यवहार ठरवावा.✔

  253. जशी नियत तशी बरकत
    अर्थ- आपले यश आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबुन असते.✔

  254. जसा भाव तसा देव
    अर्थ- आपली जशी श्रध्दा असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल.✔

  255. जाळा वाचून नाही कढ,माये वाचून नाही रड
    अर्थ- .✔

  256. ओळखीचा चोर जीवे मारी
    अर्थ- एखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो.✔

  257. ओ म्हणता ठो येईना
    अर्थ- कसलेही ज्ञान नसणे, लिहिता वाचता न येणे.✔

  258. ओठी तेच पोटी
    अर्थ- बोलावे तसे वागावे, सरळमार्गी माणूस.✔

  259. ओल्याबरोबर सुके जळते
    अर्थ- दुष्टांच्या बरोबर राहिल्याने सज्जन माणसास ही त्रास होतो.✔

  260. ओसाड रानात एरंडाचा उदो उदो
    अर्थ- अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो.✔

  261. औषधा वाचून खोकला गेला
    अर्थ- परस्पर संकट टळले.✔

  262. जिथे कमी तेथे आम्ही
    अर्थ- पडेल ते काम करून समोरच्यास हातभार लावणे.✔

  263. जेथे पिकतं तिथे विकतं नाही
    अर्थ- एखादी गोष्ट विपुल प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही.✔

  264. ज्याचंजळतं त्यालाच कळतं
    अर्थ- आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते.✔

  265. Marathi proverbs
  266. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल
    अर्थ- वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते.✔

  267. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
    अर्थ- मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.✔

  268. झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया
    अर्थ- थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते.✔

  269. झाकली मूठ सव्वा लाखाची
    अर्थ- दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.✔

  270. झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया
    अर्थ- थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते.✔

  271. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही
    अर्थ- कष्टाशिवाय यश मिळत नाही.✔

  272. ठकास महाठक
    अर्थ- प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.✔

  273. ठेवीले अनंते तैसेची राहावे
    अर्थ- जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे.✔

  274. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
    अर्थ- एका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात.✔

  275. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा
    अर्थ- जी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे.✔

  276. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
    अर्थ- आपले काम दुसऱ्यावर ढकललेतर अपयश येते, कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.✔

  277. ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला
    अर्थ- दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे.✔

  278. तळ हाताने सूर्य झाकला जात नाही
    अर्थ- छोट्या गोष्टीनी फार मोठे व थोर बाबी दडवता येत नाही.✔

  279. तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी
    अर्थ- जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.✔

  280. तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळ
    अर्थ- तरुण माणूस आळशी असतो.✔

  281. कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविले
    अर्थ- दान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे.✔

  282. कसायाला गाय धार्जिणी
    अर्थ- गुंडांच्या पुढे लोकं नमतात व पुढे पुढे करतात.✔

  283. कठीण समय येता कोण कामास येतो
    अर्थ- आपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला येत नाही.✔

  284. वागावेच लागते कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी
    अर्थ- सर्वाना प्राप्त परिस्थितीनुसार वागावेच लागते.✔

  285. कमरेचे सोडले नि डोईला बांधले
    अर्थ- सर्व लाजलज्जा टाकून देणे.✔

  286. मराठी म्हणी व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
  287. करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल काय
    अर्थ- छोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे.✔

  288. करायला गेले गणपती अन झाला मारुती
    अर्थ- जे करायचे ते नित समजून करावे नाही तर भलतेच घडते.✔

  289. करीन ती पूर्व
    अर्थ- अंगी असे कर्तुत्व असावे की जे ठरविले ते घडून आलेच पाहिजे.✔

  290. ताक कुंकून पिणे
    अर्थ- प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करणे.✔

  291. ताकास जाऊन लोटा लपवणे
    अर्थ- एखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे.✔

  292. तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू दे
    अर्थ- दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे.✔


  293. तीन तिघाडा काम बिघाडा
    अर्थ- एखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते.✔

  294. कामा पुरता मामा
    अर्थ- व्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे.✔

  295. काळ आला होता पण वेळ आली नव्हती
    अर्थ- प्राणांतिक संकटातून वाचणे.✔

  296. कावळा बसायला अन फांदी तुटायला एकाच घात
    अर्थ- योगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे.✔

  297. काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
    अर्थ- आपणास ज्या गोष्टी जसे विचार करतो तश्याच वाटतात.✔

  298. काकडीची चोरी अन फाशीची शिक्षा
    अर्थ- थोड्याश्या अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे.✔

  299. काट्यावाचून गुलाब नाही
    अर्थ- चांगली गोष्ट कठीण परीश्रमाने मिळते.✔

  300. तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे
    अर्थ- एकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे.✔

  301. तोबरयाला पुढे ,लगमला मागे
    अर्थ- फायद्याचा वेळी पुढे पुढे ,कामाच्या वेळी मात्र मागेमागे.✔

  302. तोंडाला पाने पुसणे
    अर्थ- हमी देऊन समोरच्या व्यक्तीचे काम न करणे.✔

  303. थेंबे थेंबे तळे साचे
    अर्थ- काटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते.✔

  304. कुठे राजा भोज कुठे गंगुतेली
    अर्थ- बलाढ्य माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही.✔

  305. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
    अर्थ- वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.✔

  306. कुहाडीचा दांडा गोतास काळ
    अर्थ- आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.✔

  307. कुंपणानेच शेत खाणे
    अर्थ- रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे.✔

  308. दही वाळत घालून भांडण
    अर्थ- एखाद्या नुकसानाची तमा न बाळगता वैर करणे सुरूच ठेवणे.✔

  309. दांत कोरून पोट भरतो
    अर्थ- उपजिवीकेसाठी फार थोडे श्रम घेऊन जीवन व्यतीत करणे.✔

  310. दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत
    अर्थ- सर्व गोष्टी उपलब्ध असल्यातरी त्याचा उपभोग घेता न येणे.✔

  311. दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळे
    अर्थ- प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.✔

  312. केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा
    अर्थ- अशक्य गोष्ट उशीरा हाती घेतलेली बरी.✔

  313. दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा
    अर्थ- एखादा मनुष्य एकाच ठिकाणी फार काहीअपेक्षा न ठेवता काम करतो.✔

  314. दिवस बुडाला मजूर उडाला
    अर्थ- टाम-टून काम करून निघून जाणे.✔

  315. दिवसा चुल रात्री मूल
    अर्थ- दिवस-रात्र कामाचा त्रास असणे.✔

  316. दिव्या खाली अंधार
    अर्थ- मोठ्या व्यक्तीचे सुद्धा गुण दोष असतात.✔

  317. दुःख रेड्याला न डाग पखालीला
    अर्थ- एखाद्याच्या त्रासामुळे दुसरा चांगला व्यक्ती त्रासात पडणे.✔

  318. खाता पिता दोन लाथा
    अर्थ- कायम धाकात ठेवणे.✔

  319. खायला काळ भुईला भार
    अर्थ- ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.✔

  320. खाली मुंडी पाताळ धुंडी
    अर्थ- स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो.✔

  321. खाल्ल्या मिठाला जागणे
    अर्थ- मालकाशी प्रामाणिक राहून संकट काळी मदत करणे.✔

  322. खाई त्याला खव खवे
    अर्थ- ज्यांनी चोरी केली अस्वस्थ होतो.✔

  323. खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणा
    अर्थ- गरीब मनुष्यास कोणीही कीमत देत नाही.✔

  324. खिशात नाही दमडी अन बदलली कोंबडी
    अर्थ- ऐपत नसताना बडेजाव दाखविणे.✔

  325. दुध पोळलं की ताक कुंकून प्यावे
    अर्थ- एखादा अवघड प्रसंग सोसल्यावर पुढे काळजी घेणे.✔

  326. दुधात साखर पडणे
    अर्थ- एकाचवेळी अनेक गोष्टीचा लाभ होणे.✔

  327. दुर्दैवाचे दशावतार होणे
    अर्थ- अनेक बाजूने संकट येणे.✔

  328. दुष्टी आड सृष्टी
    अर्थ- आपल्या पाहण्यापलीकडे पण जग आहे.✔

  329. दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते
    अर्थ- दु:ख लवकर संपत नाही.✔

  330. दुधाची तहान ताकावर
    अर्थ- छोट्या गोष्टीत समाधानी राहणे.✔

  331. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
    अर्थ- जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.✔

  332. गड आला पण सिंह गेला
    अर्थ- एक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे.✔

  333. गरज सरो नि वैद्य मरो
    अर्थ- स्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही.✔

  334. गरजवंताला अक्कल नाही
    अर्थ- असहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो.✔

  335. देवाची करणी अन नारळात पाणी
    अर्थ- नैसर्गिक गोष्टींना तोड नसते.✔

  336. देह देवळात चित्त पायतणात
    अर्थ- एका ठिकाणी मन एकाग्र न करता ,दुसऱ्याच ठिकाणीचित्त घोटाळणे.✔

  337. दैव देते कर्म नेते
    अर्थ- कर्म वाईट केले तर चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो.✔

  338. मराठी म्हणी pdf | Marathi Mhani List | मराठी म्हणी व वाक्प्रचार

  339. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी
    अर्थ- जिवलग दोन व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे.✔

  340. दोघींचा दादला उपाशी
    अर्थ- एकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणताही अपेक्षित लाभ न होणे.✔

  341. गरज ही शोधाची जननी आहे
    अर्थ- गरजेच्या वेळी मनुष्य हर प्रकारे हवी ती गोष्ट मिळवणे.✔

  342. गरजेल तो बरसेल काय
    अर्थ- मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत.✔

  343. गर्वाचे घर खाली
    अर्थ- गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच.✔

  344. गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने
    अर्थ- समजदार व्यक्ती काम करत आपले जीवन व्यतित करतात तर मुर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो.✔

  345. गाढवाच्या पाठीवर गोणी
    अर्थ- कष्टकरी माणसाला तया कष्टा संबधित लाभ मिळत नाही तो लाभ इतरांना मिळतो .✔

  346. नवी विटी नवे राज्य
    अर्थ- नवीन राज्यकर्ते नवीन कायदे आणतात.✔

  347. नव्याचे नऊ दिवस
    अर्थ- नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही.✔

  348. नकर्त्यांचा वार शनिवार
    अर्थ- काम न करणारा व्यक्ती फक्त बहाणे सांगतो.✔

  349. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये
    अर्थ- छोट्या व्यक्तींना नेहमी कामे सांगितली जातात.✔

  350. नरोवा कुंजरोवा
    अर्थ- कोणत्याही गोष्टीबाबत भाष्य न करणे, केल्यास संभ्रम निर्माण करणे.✔

  351. गाढवाने शेत खाल्ले ,पाप ना पुण्य
    अर्थ- वाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही.✔

  352. गाढवाला गुळाची चव काय
    अर्थ- मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते.✔

  353. गाव तिथे उकिरडा
    अर्थ- सर्व दूर सारखीच परिस्थिती असते.✔

  354. गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पान
    अर्थ- एखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे.✔

  355. गुरवाचे लक्ष निविद्यावर
    अर्थ- मनुष्य प्राण्याला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात.✔

  356. गोगल गाय पोटात पाय
    अर्थ- वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात.✔

  357. गोरा गोमटा कपाळ करंटा
    अर्थ- नुसते दिखाऊपण काही कामाचे नसते.✔

  358. घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी
    अर्थ- घर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते.✔

  359. घोंगडे भिजत पडणे
    अर्थ- एखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे.✔

  360. घोडामैदानजवळ असणे
    अर्थ- परीक्षा लवकरच होणे.✔

  361. घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर
    अर्थ- कोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे.✔

  362. नाकापेक्षा मोती जड
    अर्थ- महत्वाची गोष्ट सोडून इतर गोष्टीला महत्त्व येणे.✔

  363. नाचता येईना आंगण वाकडे
    अर्थ- स्वतः येत नसलेली गोष्ट न करता इतर गोष्टीस बोल लावणे.✔

  364. नाव सगुणी अन करणी अवगुणी
    अर्थ- नावाप्रमाणे न राहता वाईट कृत्य करणे.✔

  365. नावडतीचे मीठ अळणी
    अर्थ- नावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट आवडत नाही.✔

  366. निंदकाचे घर असावे शेजारी
    अर्थ- आपल्या टीकाकारांमुळे आपला विकास होतो.✔

  367. चढेल तो पडेल
    अर्थ- फार गर्व केला तर पराजय निशित असतो.✔

  368. चतुर्भुज होणे
    अर्थ- लग्न करणे.✔

  369. चमत्कारास नमस्कार करणे
    अर्थ- विशेषस असाध्य गोष्टीना मानाने.✔

  370. चांभाराची नजर जोड्यावर
    अर्थ- आपआपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो .✔


  371. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
    अर्थ- प्रत्येकाचा दिवस असतो.✔

  372. पुढच्यास ठेच मागचा शहाणा
    अर्थ- एकाच मार्गावरील पुढील व्यक्तीस वाईट अनुभव आल्यास तो मागच्या माणसा साठी मार्गदर्शक ठरतो.✔

  373. पी हळद आणि हो गोरी
    अर्थ- उतावीळ होणे.✔

  374. पेराल तसे उगवेल
    अर्थ- कर्मानुसार तसे फळ मिळते.✔

  375. प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतो
    अर्थ- प्रत्येकाचा दिवस येतो.✔

  376. प्रयत्नांती परमेश्वर
    अर्थ- खूप कष्ट करण्याची तयारी असली की कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते.✔

  377. चुकलेला फकीर मशिदीत
    अर्थ- मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो.✔

  378. चोर नाही तर चोराची लंगोटी
    अर्थ- भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे.✔

  379. चोराच्या उलट्या बोंबा
    अर्थ- गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.✔

  380. चोराच्या वाटा चोरालाच माहीत
    अर्थ- वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात.✔

  381. चोरीचा मामला हळू हळू बोंबला
    अर्थ- वाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो.✔

  382. चोर तो चोर वर शिरजोर
    अर्थ- गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.✔

  383. बुडत्याला काठीचा आधार
    अर्थ- संकटग्रस्त मनुष्यास छोटी मदत सुद्धा मोठी वाटते.✔

  384. बैल गेला नि झोपा केला
    अर्थ- एखाद्या गोष्टीची निकड संपल्यावर त्या गोष्टीसाठी काम करणे.✔

  385. बैल गेला अन झोपा केला
    अर्थ- एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे .✔

  386. बोलण्यापेक्ष मौन श्रेष्ठ
    अर्थ- अधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते.✔

  387. जपून पाऊल टाकणे
    अर्थ- काळजीपूर्वक काम करणे.✔

  388. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणे
    अर्थ- सर्वदूर असणे.✔

  389. जशी कामना तशी भावना
    अर्थ- आपण जसे चिंतन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात.✔

  390. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
    अर्थ- एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये.✔

  391. मनी वसे ते स्वप्नी
    अर्थ- आपण ज्या गोष्टीचा सदैव विचार करतो तीच गोष्ट आपल्याला आसपास दिसते (आभास होतो).✔

  392. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
    अर्थ- व्यक्तीचे गुणदोष सुरवातीच्या काळात लगेच कळतात.✔

  393. मूर्ती लहान पण कीर्ती महान
    अर्थ- छोटा मनुष्य तरी कार्यक्षमता खूप असणे.✔

  394. जसा गुरु तसा चेला
    अर्थ- एका प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाल त्या व्यक्तीच्या स्वभावचेच लोक निर्माण होतात.✔

  395. जावे त्याचा वंशा,तेव्हा कळे
    अर्थ- एखाद्या व्यक्तीचे दु:ख त्याच्या जवळ गेल्यावर कळते.✔

  396. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात
    अर्थ- दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते.✔

  397. लंकेची पार्वती असणे
    अर्थ- अत्यंत गरीब असणे.✔

  398. लहान तोंडी मोठा घास
    अर्थ- छोट्या व्यक्तीने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करणे.✔

  399. लंकेत सोन्याच्या विटा
    अर्थ- दुसऱ्याची श्रीमंती आपल्या काही कामाची नसते.✔

  400. लहानपण देगादेवा मुंगी साखरेचा रवा
    अर्थ- मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे.✔

  401. लेकी बोले सुने लागे
    अर्थ- एकाला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संदेश ओळखणे.✔

  402. जावयाचं पोर हरामखोर
    अर्थ- माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते.✔

  403. जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी
    अर्थ- एखद्या ठिकाणी लाभ असता तिकडे विशेष लक्ष्य देणे.✔

  404. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
    अर्थ- वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.✔

  405. जिकडे सुई तिकडे दोरा
    अर्थ- घनिष्ट संबंध असणारे एकमेकांजावळ कायम असतात.✔

  406. शितावरून भाताची परीक्षा
    अर्थ- फार थोड्या नमुन्यावरुन मोठ्या वस्तूंची चाचणी करणे.✔

  407. शुद्ध नाही मन तया काय करी साबण
    अर्थ- मनात कुविचार असता चांगले विचार ऐकणे व्यर्थ आहे.✔

  408. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी
    अर्थ- संस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात.✔

  409. शेखी मीरविणे
    अर्थ- उगाचच मोठ्या गोष्टी करणे.✔

  410. शेरास सव्वाशेर
    अर्थ- प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.✔

  411. जो खाईल आंबा तो सोशेल ओळंबा
    अर्थ- एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे.✔

  412. जो श्रमी त्याला काय कमी
    अर्थ- कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.✔

  413. ज्याचंजळतं त्यालाच कळतं
    अर्थ- आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते.✔

  414. समुद्रामाजी फुटकें तारू
    अर्थ- चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण असतात.✔

  415. सरड्याची धाव कुंपणा पर्यंतच
    अर्थ- दुर्बळ माणूस एका मार्यादेच्याआतच काम करतो.✔

  416. हत्ती गेला शेपूट राहिलं
    अर्थ- अवघड काम संपल्यानंतर छोटे (सोपे) राहणे.✔

  417. हपापाचा माल गपापा
    अर्थ- अती हव्यासाने असलेले द्रव्य ही नष्ट होते.✔

  418. हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी
    अर्थ- मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे.✔

  419. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
    अर्थ- स्वतःच्या व्यवसायात नामांकित असूनही आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासंबधित सुविधा देता न येणे.✔

  420. हात दाखवून अवलक्षण
    अर्थ- उगाचच विविध गोष्टी मागे धावून हसे करुन घेणे.✔

  421. सरकारी काम अन बारा महिने थांब
    अर्थ- काही कामं नेहमी विलंबाने होत असतात, त्या साठी धीर देणे योग्य.✔

  422. संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून प्रारंभ
    अर्थ- मुळात कमी तयारी असलेल्या व अडखळत असलेल्या कार्यात अनेक बाधा येणे.✔

  423. साखरेचे खाणार त्याला देव देणार
    अर्थ- सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते.✔

  424. ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल
    अर्थ- वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते.✔

  425. ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
    अर्थ- मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.✔

  426. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
    अर्थ- एका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात.✔

  427. ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा
    अर्थ- जी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे.✔

  428. ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी
    अर्थ- आपल्या मालकाचे गुणगान करणे.✔

  429. दिवाळी दसरा हात पाय पसरा
    अर्थ- सण बघून भरमसाठ खर्च करणे.✔

  430. दिसतं तस नसतं म्हणून जग फसतं
    अर्थ- दिखाऊ गोष्टी या कायम तकलादू असतात, मुळात वेगळेच काही असते.✔

  431. दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त
    अर्थ- मुलांपेक्षा नातवंडांवर अधिक प्रेम असणे.✔

  432. दुष्काळात तेरावा महिना
    अर्थ- संकटात अधिक भर पडणे.✔

  433. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही
    अर्थ- स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे.✔

  434. ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी
    अर्थ- आपल्या मालकाचे गुणगान करणे.✔

  435. झाकली मूठ सव्वा लाखाची
    अर्थ- दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.✔


  436. झालं गेलं अन गंगेला मिळालं
    अर्थ- भूतकाळाच्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे.✔

  437. डल्ला मारणे
    अर्थ- दुसऱ्याची वस्तू चोरणे.✔

  438. डोळ्यात अंजन घालणे
    अर्थ- एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे.✔

  439. डोंगर पोखरून उंदीर कढणे
    अर्थ- जास्त श्रम करून कमी फायदा होणे.✔

  440. ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो
    अर्थ- कारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो.✔

  441. तळ्यात मळ्यात करणे
    अर्थ- मनाची अवस्था अस्थिर असणे.✔

  442. तहान लागल्यावर विहीर खोदणे
    अर्थ- गरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे.✔

  443. ताकापुरते रामायण
    अर्थ- एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे. स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे. .✔

  444. ताकास तूर न लागू देणे
    अर्थ- मनातील गोष्ट न सांगणे.✔

  445. तू राणी मी राणी पाणी कोण आणी
    अर्थ- दोन सुकुमार ,नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही, असे व्यक्ती जवळ आल्यास एकमेकांचा एकमेकांना फटका बसतो.✔

  446. तेरड्याचा रंग तीन दिवस
    अर्थ- एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.✔

  447. दगडा पेक्षा वीट मऊ
    अर्थ- छोट्या गोष्टीत समाधानी राहणे.✔

  448. दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत
    अर्थ- रिकामटेकडा मनुष्य आपण खूप व्यस्त आहे असे दर्शवितो.✔

  449. दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये
    अर्थ- महत्त्वाची व्यक्ती गेली तर फार मोठे नुकसान होते.✔

  450. दक्षिणा तशी प्रदक्षिणा
    अर्थ- व्यवसायात जसा लाभ असेल तसे महत्त्व आपल्या ग्राहकास देणे.✔

  451. दगडावरची रेघ
    अर्थ- कायमची गोष्ट.✔

  452. दहा गेले पाच उरले
    अर्थ- आत्मविश्वास कमी होणे.✔

  453. दात कोरुन पोट भारता येत नाही
    अर्थ- इकडून तिकडून आणलेल्या अल्प मिळकतीवर जीवन व्यतीत करता येत नाही.✔

  454. दाम करी काम
    अर्थ- पैशाला किंमत असते.✔

  455. दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो
    अर्थ- कष्टकरी आपले पोट अत्यंत जिकिरीने भरतो.✔

  456. 50 Marathi proverbs
  457. दानवाच्या घरी रावण देव
    अर्थ- जसा आपला स्वभाव तसे आपले श्रद्धास्थान बदलते.✔

  458. दारात नाही आड म्हणे लावतो झाड
    अर्थ- साधने नसताना एखादी गोष्ट हौस म्हणून करणे.✔

  459. दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात कापूस वेचीत
    अर्थ- दिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.✔

  460. दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं
    अर्थ- दिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे.✔

  461. देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं
    अर्थ- उगाचच एखाधाची कुरापत काढणे.✔

  462. देश तसा वेश
    अर्थ- प्रदेशाप्रमाणे आपले संस्कार, पोशाख बदलतो.✔

  463. दे माय धरणी ठाय करणे
    अर्थ- खूप त्रस्त होणे.✔

  464. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
    अर्थ- दोन वेगवेगळ्या समूहाना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला तोटा होतो.✔

  465. द्या दान सुटे गिरान (ग्रहण)
    अर्थ- एखादा आशावाद दाखवून द्रव्याची अपेक्षा करणे.✔

  466. ध चा मा करणे
    अर्थ- सांगताना एखाद्या मूळ गोष्टीत बदल करून आपला स्वार्थ साधणे.✔

  467. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
    अर्थ- असलेल्या व अडखळत मुळात कमी तयारीअसलेल्या कार्यात अनेक बाधा येणे.✔

  468. नर का नारायण बनणे
    अर्थ- कर्म करून उच्च होणे.✔

  469. नव्याची नवलाई
    अर्थ- एखाद्या नवी गोष्टीचा उदोउदो करणे.✔

  470. नसून खोळंबा असून दाटी
    अर्थ- एखाद्या प्रमुख व्यक्तीचा कोणताही उपयोग न होणे.✔

  471. नाकाचा बाल
    अर्थ- अत्यंत प्रिय व्यक्ती.✔

  472. नाकापेक्षा मोती जड होणे
    अर्थ- डोईजड होणे.✔

  473. नाव मोठे लक्षण खोटे
    अर्थ- #श्रीमंत असून कंजूष असणे, #श्रीमंत असण्याचा आव आणणे.✔

  474. नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळा
    अर्थ- नावाप्रमाणे महती नसणे.✔

  475. नाक दाबले की तोंड उघडते
    अर्थ- मनस्थितीत हवे ते काम एखाद्यास कोंडीत पकडून ऋण घेता येते.✔

  476. निर्लज्जम सदा सुखी
    अर्थ- वाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही.✔

  477. पहिले पाढे पंचावन्न
    अर्थ- भरपूर समजावुन सुद्धा वाईट वागण्यात बदल न होणे.✔

  478. पाण्यात राहून माशाशी वैर
    अर्थ- बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?.✔

  479. पालथ्या घड्यावर पाणी
    अर्थ- नि:र्बुध्ध व्यक्तीचे वर्तन सुधारत नाही.✔

  480. पाण्यात राहून माशाशी वेर
    अर्थ- बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?.✔

  481. पायीची वहाण पायी बरी
    अर्थ- योग्यतेप्रमाणे वागवावे.✔

  482. फट म्हणताच ब्रम्ह
    अर्थ- हत्या छोट्या गोष्टीवरुन दोषी ठरवणे.✔

  483. बळी तो कान पिळी
    अर्थ- बलवान माणूस दुर्बळ माणसांना पिडतो.✔

  484. बडा घर पोकळ वासा
    अर्थ- #श्रीमंत असून कंजूष असणे, #श्रीमंत असण्याचा आव आणणे.✔

  485. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर
    अर्थ- कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे.✔

  486. बाळाचे बाप ब्रह्मचारी
    अर्थ- निष्पाप वाटणाऱ्या व्यक्ती दोषी असणे.✔

  487. बाबाही गेला दशम्या गेल्या
    अर्थ- एकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे.✔

  488. बोलाचीच कढी बोलाचाच भात
    अर्थ- खोटी आश्वासने देणे.✔

  489. बोलाचीच कढी बोलाचाच भात
    अर्थ- कार्य न करता वायफळ बडबड करणे.✔

  490. भरंवशाच्या म्हशीला टोणगा
    अर्थ- पूर्ण निराशा करणे.✔

  491. भित्यापाठी ब्रह्म राक्षस
    अर्थ- भित्रा माणूस सदैव कोणत्याही छोट्या बाबीना घाबरतो.✔

  492. ल्या गाड्यास सूप जड नाही
    अर्थ- समर्थ व्यक्तीला छोटे काम विशेष वाटत नाही.✔

  493. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
    अर्थ- काही गोष्टी स्वतःअनुभावल्याशिवाय कळत नाही.✔

  494. यज्ञास बळी बोकडाचा
    अर्थ- दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे.✔

  495. रात्र थोडी सोंगे फार
    अर्थ- काम भरपूर, वेळ कमी.✔

  496. राजा उदार झाला हाती भोपळा दिला
    अर्थ- आशा असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने अपेक्षेनुसार काम न करणे.✔

  497. राम कृष्ण आले गेले तरीही जग का चालायचे थांबले
    अर्थ- व्यावहारिक बाबी कुणासाठीही थांबत नाही.✔

  498. वराती मागून घोडे
    अर्थ- एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे .✔

  499. वाचाल तर वाचाल
    अर्थ- शिक्षण घेतले की तरच प्रगती होऊ शकते.✔

  500. वारा पाहून पाठ फिरवावी
    अर्थ- वातावरण पाहून वागावे.✔

  501. वाळूचे कणही रगडीता तेलही गळे
    अर्थ- कठोर परिश्रमामुळे कोणतीही गोष्ट साध्या होऊ शकते.✔

  502. वाड्याचे तेल वाग्यांवर
    अर्थ- एका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे.✔

  503. वाऱ्यावरती वरात काढणे
    अर्थ- स्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे कार्य करणे.✔

  504. वासरात लंगडी गाय शहाणी
    अर्थ- मूर्ख लोकांमध्ये कमी बुध्धिवान मनुष्यसुद्धा प्रसिद्ध असतो.✔

  505. विंचवाचे बिहाड पाठीवर
    अर्थ- फिरत्या माणसाचा ठाव ठिकाणा लागणे मुश्कील असते किंवा अस्थिर गोष्टी या कायम मूळ विषयापासून भटकतात.✔

  506. शेंडी तुटो की पारंबी तुटो
    अर्थ- एखाद्या गोष्टीचे परिणाम काय राहणार याची चिंता न करणे.✔

  507. शेरास सव्वाशेर
    अर्थ- प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ.✔

  508. शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड
    अर्थ- आपल्या स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाचा विचार न करणे.✔

  509. श्वानाचीया भुंकण्याला हती देईना किंमत
    अर्थ- बलवान व्यक्ती दुर्बल माणसाला किंमत देत नाही.✔

  510. संगत गुण से सोबत गुण
    अर्थ- दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे.✔

  511. सुंठेवाचून खोकला गेला
    अर्थ- परस्पर संकट टळले.✔

  512. सुंभ जळतो पण पिळ जळत नाही
    अर्थ- भरपूर शिक्षा होऊन सुध्दा वाईट प्रवृत्ती नष्ट करता येत नाही.✔

  513. हत्ती गेला शेपूट राहिलं
    अर्थ- अवघड काम संपल्यानंतर छोटे (सोपे) राहणे.✔

  514. हपापाचा माल गपापा
    अर्थ- अती हव्यासाने असलेले द्रव्य ही नष्ट होते.✔

  515. हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी
    अर्थ- मोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे.✔

  516. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
    अर्थ- स्वतःच्या व्यवसायात नामांकित असूनही आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासंबधित सुविधा देता न येणे.✔

  517. हात दाखवून अवलक्षण
    अर्थ- उगाचच विविध गोष्टी मागे धावून हसे करुन घेणे.✔

  518. हातावर तुरी देणे
    अर्थ- एखाद्याच्या कचाट्यातून सुटणे.✔

  519. हा सूर्य आणि हा जयद्रथ
    अर्थ- पुराव्यासहित सिद्ध करणे.✔

  520. हातच्या कंकणाला आरसा कशाला
    अर्थ- उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते.✔

आम्हाला आशा आहे कि म्हणी व त्यांचे अर्थ | मराठी वाक्प्रचार व अर्थ आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Marathi mhani funny, मराठी जुन्या म्हणी किंवा Marathi riddles with answers, Mhani in marathi with meaning संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले हिंदी म्हणी, महणी मराठी, Marathi money, Proverbs meaning in marathi, मराठी म्हणी 100, 50 Marathi proverbs आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post